Price: ₹225 - ₹140.17
(as of Oct 03, 2024 23:47:17 UTC – Details)
‘दुर्दम्य इच्छाशक्ती, यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा आणि स्वहितापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची मनोमन इच्छा यांना प्रज्वलित करण्याची क्षमता या पुस्तकात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्याकडे आपली पावले वळतात.” – नंदकुमार दुराफे विभागीय व्यवस्थापक, टाटा मोटर्स कुठल्याही परिस्थितीशी सामना करताना आपल्याकडे नेहमी दोन पर्याय असतात, १. माझी सद्यःस्थिती… परिस्थिती अशी आहे ‘म्हणून’ आहे. २. माझी सद्यःस्थिती… परिस्थिती अशी आहे ‘तरी सुद्धा’ मी बदलू शकतो. बहुतांश लोक पहिला पर्याय निवडून आयुष्यभर आहे तिथेच राहतात, तर काही दुसऱ्या पर्यायाच्या आधारे गरुडभरारी घेतात; पण असे लोक इतरांच्या मदतीची वाट न बघता स्वयंप्रेरित होऊन स्वसामर्थ्याने स्वतःचा उद्धार करतात. मग ती स्वयंप्रेरणा असते तरी काय? ती कशी निर्माण होते? तिच्या मदतीने यशोशिखरावर कसे पोहोचता येते, याविषयी जाणून घ्या या पुस्तकातून. अशा असामान्य कर्तृत्वाच्या कथा आपल्याला प्रेरित करतील. दुसरा पर्याय निवडण्यास प्रवृत्त करणारे हे पुस्तक प्रत्येक सामान्य व्यक्तीला प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यशोशिखरावर पोहोचण्यास मदत करेल. तेव्हा या पुस्तकाच्या साह्याने स्वतःला प्रेरित करा आणि स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा.
From the Publisher
Mich Ghadvinar Maze Aayushya by Jaiprakash Zende
Book Review
‘‘दुर्दम्य इच्छाशक्ती, यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा आणि स्वहितापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची मनोमन इच्छा यांना प्रज्वलित करण्याची क्षमता या पुस्तकात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्याकडे आपली पावले वळतात.’’
– नंदकुमार दुराफे
विभागीय व्यवस्थापक, टाटा मोटर्स
‘‘सर्वसामान्य लोक, मानसशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी तसेच आपल्या आयुष्याची दिशा सुनिश्चित करून त्यासाठी वाटचाल करीत असलेल्या बहुसंख्य तरुणांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो.’’
डॉ. सदानंद चावरे
होमिओपॅथिक कन्सल्टन्ट, पुणे.
आपल्याला आयुष्यात अतिशय उत्कटतेने काय हवं आहे? असा प्रश्न विचारल्यास आपण नक्कीच ‘‘मला यशस्वी व्हायचं आहे’’ असंच म्हणाल, याची खात्री आहे. यश मिळविण्यासाठी पहिल्यांदा काय करायचे आहे हे जाणण्यासाठी आपल्याकडे शहाणपण हवं. मग ते कसं करायचं त्यासाठी ज्ञान हवं. त्यानंतर जे करायचं आहे ते करण्यासाठी स्वयंप्रेरणा हवी असते; पण ही स्वयंप्रेरणा म्हणजे काय? हे समजण्यासाठीच तर हे पुस्तक आहे.
मुख्य प्रश्न असा आहे की, ‘‘आपण निश्चित केलेलं ध्येय प्राप्त कसं करायचं? आपल्याला हवं आहे ते कसं मिळवायचं?’’
हे पुस्तक तुम्हाला स्वत:च स्वत:चे उज्ज्वल भविष्य घडविण्यास अत्यंत मार्गदर्शक ठरेल. आयुष्यात यश आणि आनंद कसा मिळवायचा, हे जाणून घेण्यासाठीच तर या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. यात दिलेली मार्गदर्शक तत्त्वे वापरून अनेकांनी यश आणि आनंद मिळविलेला आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे समजून घेऊन त्याप्रमाणे कृती केली तरच ती परिणामकारक ठरतील. जी माणसं कृती करणारच नाहीत त्यांना ती कुचकामी वाटतील. थोडक्यात, यशप्राप्तीसाठी आणि आयुष्य घडविण्यासाठी स्वयंप्रेरणा निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करेल यात शंका नाही.
कुठल्याही परिस्थितीशी सामना करताना आपल्याकडे नेहमी दोन पर्याय उपलब्ध असतात,
1. माझी सद्य:स्थिती… परिस्थिती अशी आहे ‘म्हणून’ आहे.
2. माझी सद्य:स्थिती… परिस्थिती अशी आहे ‘तरी सुद्धा’ मी बदलू शकतो.
बहुतांश लोक पहिला पर्याय निवडून आयुष्यभर आहे तिथेच राहतात, तर काही दुसऱ्या पर्यायाच्या आधारे गरुडभरारी घेतात; पण असे लोक इतरांच्या मदतीची वाट न बघता स्वयंप्रेरित होऊन स्वसामर्थ्याने स्वत:चा उद्धार करतात. मग ती स्वयंप्रेरणा असते तरी काय? ती कशी निर्माण होते? तिच्या मदतीने यशोशिखरावर कसे पोहोचता येते, याविषयी जाणून घ्या या पुस्तकातून. अशा असामान्य कर्तृत्वाच्या कथा आपल्याला प्रेरित करतील.
दुसरा पर्याय निवडण्यास प्रवृत्त करणारे हे पुस्तक प्रत्येक सामान्य व्यक्तीला प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यशोशिखरावर पोहोचण्यास मदत करेल. तेव्हा या पुस्तकाच्या साह्याने स्वत:ला प्रेरित करा आणि स्वत:च्या आयुष्याचे शिल्पकार व्हा.
जयप्रकाश भालचंद्र झेंडे
जयप्रकाश भालचंद्र झेंडे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. टाटा मोटर्स या जगप्रसिद्ध वाहन उद्योगात त्यांनी तीस वर्षे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यात प्लॅनिंग, कास्टिंग आणि इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग या विभागांचा समावेश होता. या काळात भारतात नवीनच आलेल्या कायझेन, सजेशन स्किम, क्वालिटी सर्कल, फाइव्ह एस अशा आपल्या कामात निरंतर सुधारणा करणाऱ्या जपानी कार्यपद्धतीत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
निवृत्तीनंतर आता ते औद्यागिक सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत. आतापर्यंत भारतातील अनेक प्रसिद्ध संस्थांमधून सुमारे 1500 च्या वर कार्यशाळा घेऊन 25,000 अधिकारी आणि कामगारांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. त्यांना लेखनाचा छंद आहे. यातूनच त्यांनी अनेक दैनिके आणि नियतकालिकांतून सुमारे 250 लेख लिहिले आहेत. त्यांच्या लेखनाचे विषय सर्वसाधारणपणे स्वत:त आणि संस्थेत सुधारणा कशी घडवून आणता येईल याच्याशी निगडित असतात. त्याचबरोबर आतापर्यंत त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Customer Reviews
4.5 out of 5 stars
2
4.0 out of 5 stars
1
4.2 out of 5 stars
30
—
—
5.0 out of 5 stars
5
Price
₹175.00₹175.00 ₹125.01₹125.01 ₹250.00₹250.00
— ₹56.21₹56.21 ₹200.00₹200.00
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; Second edition (1 January 2015); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 216 pages
ISBN-10 : 9352200209
ISBN-13 : 978-9352200207
Item Weight : 220 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book