Price: ₹250 - ₹212.00
(as of Oct 05, 2024 22:42:12 UTC – Details)
चाकोरीत अडकला आहात?
संशयाने पछाडले आहात?
कंटाळवाणे वाटत आहे?
‘अनफ*क युअरसेल्फ’ या पुस्तकातून आपली चराचर सृष्टी जणू तुम्हाला चपराक देऊन भानावर आणते आणि सांगते की, तुमच्यातल्या खर्या सामर्थ्यानिशी डौलदारपणे आयुष्यात परत या.
आपल्या अंतर्मनातल्या टीकाकारावर नियंत्रण कसं मिळवायचं आणि काहीतरी भव्यदिव्य करून दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करायची हे लोकप्रिय लेखक आणि लाइफ कोच गॅरी जॉन बिशप आपल्याला प्रस्तुत पुस्तकातून दाखवून देतात.
तुमच्या समस्या कोणत्याही प्रकारच्या असोत. काहीतरी चमत्कार घडून वाट पाहण्यात वेळ व्यर्थ घालवणे थांबवा; कारण जादू किंवा चमत्कार होणार नाहीत. आता आहे त्याहून आनंदाचं आणि समाधानाचं आयुष्य तुम्हाला मिळण्यामधला एकमेव अडथळा तुम्ही स्वत: आहात.
वायफळ विचारातून बाहेर पडून तुमच्यातल्या महानतेला बंधमुक्त करण्याची हीच वेळ आहे.
“सेल्फ-हेल्प प्रकारच्या पुस्तकांच्या दुनियेत वादळ उठवणार्या; थेट मुद्द्याला हात घालणार्या ग्लासगो, स्कॉटलंडच्या गॅरी जॉन बिशप यांना या पुस्तकातून भेटा.”
– संडे हेराल्ड
From the Publisher
Girl, Wash Your Face
इतर सगळ्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकं ठरवता आलं आहे आणि तुम्हाला मात्र त्याचा थांगपत्ताही लागत नाही असा संशय तुम्हाला कधी आला आहे का? असं जर तुम्हाला वाटत असेल तर रेचल हॉलिस यांना काहीतरी सांगायचं आहे. त्या म्हणतात:
ही चुकीची समजूत आहे.
रेचल हॉलिस या लाइफस्टाइलविषयक वेबसाइटच्या म्हणजे द चिकसाइट डॉट कॉमच्या (ढहशउहळलडळींश.लेा) संस्थापक आणि स्वतःच्या मालकीच्या मीडिया कंपनीच्या सीइओ आहेत. त्यांनी प्रचंड विस्तार असलेला एक ऑनलाइन समुदाय (कम्युनिटी) विकसित केला आहे. यावर त्या चांगलं आयुष्य कसं जगायचं यासंबंधीच्या युक्तीच्या चार गोष्टी तर सांगतातच; पण त्याचवेळी स्वतःच्या आयुष्यातील गोंधळाबाबतही त्या निर्भीडपणे लिहितात. या नव्या आव्हानात्मक आणि प्रेरणादायी पुस्तकात रेचल यांनी जीवनविषयक वीस चुकीच्या समजुतींवर प्रकाशझोत टाकला आहे. या चुकीच्या समजुती आपल्याला आनंदी, उत्पादक आयुष्य जगण्यापासून मागे खेचतात. या चुकीच्या समजुती आपण स्वत:लाच इतक्या वेळा सांगितलेल्या असतात की, पुढे पुढे तर आपल्याला तेच सत्य आहे असं वाटायला लागतं.
प्रस्तुत पुस्तकात रेचल हॉलिस वेदनादायक प्रामाणिकपणा आणि निर्भीड विनोदाच्या साहाय्याने त्यांच्या आयुष्यातील चुकीच्या समजुतींविषयी विस्ताराने चर्चा करतात. त्यांची तपासणी करतात आणि या समजुतींनी त्यांना कसं भावविवश केलं होतं, अयोग्य ठरवलं होतं, याचीही उदाहरणं देतात. पण याच्यावर मात करण्यासाठी त्यांना विशिष्ट असे कोणते व्यावहारिक धोरण उपयुक्त ठरले, हेही त्या उघड करून दाखवतात. या सगळ्या प्रक्रियेत त्या प्रोत्साहन देतात, मनोरंजन करतात आणि कधी कधी थोडी फार थट्टा-मस्करीही करतात. खरोखरच आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण स्त्री होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे, ते तुम्ही केले पाहिजेत याची खात्री पटवण्यासाठी, हा सगळा लिखाणाचा घाट त्यांनी घातला आहे.
दृढ विश्वास, कणखरपणा आणि चिकाटी या गुणांबरोबरच प्रस्तुत पुस्तक आयुष्य हे प्रेम, उत्कटता, कठोर परिश्रम करून आणि कृतिशील राहून कसे जगायचे हे दाखवून देते. कोणतीही गोष्ट सोडून न देता ती प्रयत्नपूर्वक करत राहणे आणि यात तुम्ही स्वतःचा डौलदारपणा कसा जपायला हवा, हेही हे पुस्तक सांगते.
Book Review
‘‘रेचल हॉलिस तुम्हाला जर तुमचा चेहरा धुवा असं सांगत असेल तर आत्ताच नळ सुरु करा… नव्याने आई होणार्या मुलींपासून ते अगदी अनुभवी व्यावसायिक महिलांपर्यंत… प्रत्येक स्त्रीसाठी ती एक मार्गदर्शक, गुरु आहे.’’
-अॅना टॉड, न्यूयॉर्क टाइम्स आणि ‘आफ्टर सिरीज’ या इंटरनॅशनल बेस्ट सेलरच्या लेखिका
‘‘रेचलचा आवाज हा प्रेरणादायी जीवन प्रशिक्षक आणि तुमची सर्वांत जवळची (मजेशीर) मैत्रीण यांचा मन जिंकणारा मिलाफ आहे. ‘गर्ल, वॉश युअर फेस’ हे पुस्तक धक्कादायक वाटेल इतके प्रामाणिक, आनंदी वृत्ती वाढवणारे विनम्रपणे लिहिलेले आहे.आयुष्याचा विकास व्हावा आणि धैर्याने विश्वसनीय जीवन जगावं असं वाटणार्या स्त्रियांना हे पुस्तक ही एक देणगी आहे.’’
-मेगन टॅमटे, ‘एव्हरइव्ह’च्या संस्थापक आणि को-सीईओ ‘(एव्हरइव्ह’ ही नव्याने आई झालेल्या स्त्रियांसाठी कपड्यांची स्टोअर्स असलेली संस्था.)
‘‘नेतृत्वाच्या क्षेत्रात स्त्रियांना- ‘नेतृत्व करा!’ असं सांगणार्या फारशा स्त्रिया नाहीत.आयुष्यात आपल्याला आपली काळजी घेणारे खूपजण भेटतात; पण कडक शिस्तीत प्रशिक्षण देणारे पण प्रशिक्षक क्वचितच भेटतात. रेचल प्रेमाने; पण ठामपणे सांगते की, कमी कुवतीच्या माणसांच्या नियंत्रणाखाली आपण जाणं थांबवण्याची वेळ आता आली आहे. आता अधिक प्रयत्नपूर्वक आपलं विलक्षण आणि मौल्यवान आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. ‘गर्ल, वॉश युअर फेस’ हा शक्तिशाली आणि चैतन्यशील व्हा असं थेटपणे सांगणारा प्रेमळ उपदेश आहे. गोंधळ आणि चिंता करणं सोडा, घाई करा आणि काही वर्षांपूर्वी जी स्वप्नं तुम्ही गुंडाळून ठेवली होती. त्यांचा पाठपुरावा करा, असं ती सांगते. या मुलीवर प्रेम करा.’’
– जेन हॅटमेकर, न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या फॉर द लव्ह आणि ऑफ मेस अॅण्ड मॉक्सी या पुस्तकांच्या लेखिका. (या आनंदी ऑनलाइन होस्टेसला लाखो प्रेक्षक फॉलो करतात.)
Book Review
‘‘रेचल हॉलिस, ही तिच्या पहिल्याच पुस्तकात प्रोत्साहन देणार्या प्रमुखाची भूमिका कमी तर जीवन शिक्षकाची भूमिका जास्त निभावते आहे. याचाच अर्थ, हे विचारप्रवण पुस्तक वाचणार्या मैत्रिणी केवळ प्रेरित होऊन निघून जातील असं नव्हे तर त्यांची स्वप्नं प्रत्यक्षात येण्यासाठी लागणारी योग्य साधनंही त्यांना या वाचनातून मिळतील आणि त्यासह त्यांची वाटचाल सुरू होईल. रेचल स्वप्नं बघणारी आणि ती सत्यात आणणारी स्त्री आहे. तुम्हीही तिचे हे नवीनतम पुस्तक वाचाल, तेव्हा तुुम्हालाही तीची मत पटतील.’’
– जेसिका होनेगर, ‘नूनडे कलेक्शन’ च्या संस्थापक आणि को-सीईओ
‘‘एका परिच्छेदात, तुम्हाला मोठ्याने हसायला लावायची आणि याच बरोबर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा समग्रपणे पुनर्विचार करायला लावण्याची दुर्मीळ क्षमता रेचलच्या लिखाणात आहे. तिचे शब्द आणि हे पुस्तक ही एक अमूल्य भेट असून, ती तुम्हाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित करण्यासोबतच आव्हानही देईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.’’
– जेफरसन आणि अलिसा बेथकी, न्यूयॉर्क टाइम्स जिझस-रिलीजन आणि लव्ह दॅट लास्टस् या लोकप्रिय पुस्तकांचे लेखक
Rachel hollis
रेचल हॉलिस या सर्वाधिक खपाच्या लेखिका, टीव्हीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, लोकप्रिय वक्ता आणि चिक मीडिया या संस्थेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही संस्था महिलांना डिजिटल आशयसामग्री पुरवणारी एक अतिशय महत्त्वाची अधिकारी संस्था आहे. आयएनसी या अमेरिकी व्यवसायविषयक नियतकालिकात30 वर्षे वयाखालील सर्वोत्तम30 उद्योजक या गटात रेचल हॉलिस यांची निवड झाली आहे. रेचल त्यांची संक्रमित करणारी ऊर्जा इतर महिलांना त्यांच्या आयुष्यावर स्वत:चे नियंत्रण राहावे आणि निर्भयपणे त्यांच्या अतिशय आवडीच्या गोष्टींचा पाठपुरावा करता यावा यासाठी-सक्षम बनवण्यासाठी वापरतात. रेचल यांचं बोलणं सकारात्मक, उत्साहवर्धक आणि स्फूर्तिदायी असतं. सर्वांना त्यांच्याशी सुलभपणे संपर्क साधता येतो.
जसं घडलं तसं सांगण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे एक उत्साहवर्धक दृष्टिकोन निर्माण होतो, जो जगभरातील लाखो महिलांना विश्वसनीयरीत्या त्यांच्याशी जोडण्याची संधी देतो. चिक मीडिया महिलांची लाइफस्टाइल सुधारण्याविषयक पुरस्कारप्राप्त ब्लॉगसाठी नावीन्यपूर्ण आणि आकर्षक कंटेंट निर्माण करते. रेचल यांनी जगातल्या टॉप ब्रँड्सबरोबर काम केलं आहे. सर्वोत्तम खपाच्या गर्ल सिरीज पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. यामध्ये‘पार्टी गर्ल’, ‘स्वीट गर्ल’ आणि‘स्मार्ट गर्ल’ यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी‘अपस्केल डाउनहोम’ हे रेसिपीचं पुस्तक देखील लिहीलं आहे. रेचल लॉस एंजेलिसमध्ये पती आणि चार मुलांसोबत राहतात. अधिक माहितीसाठी‘द चिकसाइट डॉट कॉम’ (TheChicSite.com) ला भेट द्या.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (9 June 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 192 pages
ISBN-10 : 9352203224
ISBN-13 : 978-9352203222
Item Weight : 150 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book